Type Here to Get Search Results !

दहिवडी नगरपंचायत निवडणूक I मतमोजणी दिवशी वाहतूक मार्गात असा होणार तात्पुरता बदल



म्हसवड/प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी नगरपंचायतची निवडणूक मतमोजणी 19 जानेवारी रोजी  शासकीय धान्य गोदाम दहिवडी या ठिकाणी पार पडणार आहे. 


या परिसरातील वाहन धारकांच्या व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने  वाहतूक सुरळीत व सुरक्षित व्हावी व अनुचित प्रकार होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी 19 जानेवारीच्या सकाळी ७.०० वाजल्यापासून ते मतमोजणी प्रक्रिया पार पडेपर्यत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी शासकीय धान्य गोदाम परिसरातील वाहतुकीच्या मार्गात पुढीलप्रमाणे तात्पूरता बदल केला आहे.


दहिवडी गावातील फलटण चौक-मार्डी चौक मार्ग राणंद मार्डीकडे जाणारी व नमूद गावाहून दहिवडीकडे येणारी वाहतुक ही फलटण चौकातुन दहिवडी ते फलटण जाणाऱ्या रोडने दहिवडी गावातील जुना फलटण रोडने कादरशा दर्यासमोरून, तेली चाकाजवळील जिल्हा परिषद शाळेजवळून राणंद मार्डी बाजुकडे... तसेच दहिवडी गावातील फलटण चौक - मायणी चौक - सिध्दनाथ मंदीर मार्गे गोंदवले म्हसवड मायणी बाजुकडे जाणारी तसेच नमूद गावाहून दहिवडी कडे येणारी वाहतुक एस.टी.स्टॅण्ड दहिवडी येथून डंगारे पेट्रोलपंपाचे समोरून पिंगळी बुद्रुक गावातील मुख्य चाक मार्ग खांडसरी चौक व तेथून मायणी गोंदवले बुद्रुक व म्हसवड बाजुकडे असा बदल करण्यात आला आहे. या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घेऊन पोलीस दलास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies