Type Here to Get Search Results !

आटपाडीत भिंत अंगावर पडून एकजण ठार





आटपाडी : आटपाडी शहरातील आबानगर चौक येथे दुकान गळ्यातील भिंत ब्रेकरच्या साह्याने पाडत असताना ती अंगावर पडल्याने एकजण जागीच ठार तर एकजण जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, काल दिनांक १७ रोजी आटपाडी शहरातील आबानगर चौक येथील एका दुकानगाळ्यात असणारी भिंत हा गणेश उत्तम जाधव (व.व.३५ रा. आंबेबनमळा) हा ब्रेकरच्या साह्याने पाडत होता. सांयकाळी ५.३० च्या दरम्यान भिंत पाडत असताना ती भिंत गणेश जाधव याच्या अंगावर पडली. यावेळी त्याच्या डोक्याला मार लागला होता.


यावेळी परिसरातील नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले परंतु मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्याचा या दुर्देवी घटनेत जागीच मृत्यू झाला. तर रमेश लोखंडे हा जखमी झाला. मृत्य गणेशच्या पश्चात दोन मुले आहेत. सदर घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies