Type Here to Get Search Results !

बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार 27 जानेवारीला : सहायक आयुक्त ज. बा. करीम

 


सांगली : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत बेरोजगार व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी गुरूवार, दि. 27 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आला आहे.


 इच्छुक युवक व युवतींनी सेमिनारच्या meet.google.com/yfm-ouvc-boj  या लिंकवर विहीत वेळेपूर्वी 10 मिनिटे अगोदर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.


या सेमिनारमध्ये रेशीम उद्योग तुती लागवड व किटक संगोपन तंत्र या विषयी जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी. बी. कुलकर्णी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माहिती व मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सहायक आयुक्त ज. बा. करीम व कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी आ. बा. तांबोळी यांचा या सेमिनारमध्ये सहभाग असणार आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies