Type Here to Get Search Results !

श्री शंकर सहकारी चे दोन लाख मे. टन ऊस गाळप पुर्ण



माळशिरस/विष्णु भोंगळे : श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर च्या दोन लाख मे. टन च्या पुढील पहिल्या ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी चे पूजन सोमवार दि. १८ रोजी, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व सौ. नंदिनीदेवी मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, श्री शंकर सहकारी चे व्हा. चेअरमन ॲड. मिलिंद कुलकर्णी व पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते मुकादम सुखदेव महादेव वाघमोडे व ऊस वाहक ज्ञानदेव बिरा दडस यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय वाघमोडे, रामदास कर्णे, धोंडीराम नाळे, नारायण सालगुडे पाटील, सुरेश मोहिते, गणपतराव वाघमोडे, शहाजी धायगुडे, शिवाजी लवटे, दादा वाघमोडे, विलास फडतरे, RPI चे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ भोसले, सरपंच देविदास ढोपे, एकनाथ वाघमोडे आदी मान्यवर तसेच शंकर सहकारी चे सभासद, शेतकरी, सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies