सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून ‘हि’ नावे निश्चित



सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी भाजपकडून मनीष दळवी तर उपाध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकर यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. तर आघाडीच्यावतीने अध्यक्ष पदासाठी व्हिक्टर डांट्स तर उपाध्यक्ष पदासाठी सुशांत नाईक यांनी अर्ज दाखल केला आहे.


जिल्हा बँकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सत्ता आली आहे. या बँकेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या 19 जागांपैकी भाजपला ११ तर महाविकास आघाडीला ८ जागा मिळाल्या आहेत. जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत, विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजन तेली पराभूत झाले आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured