Type Here to Get Search Results !

‘या’ राज्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार?






मुंबई : करोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. कोरोना काळात निवडणुका होणार असल्याने निवडणूक आयोगाकडून काही निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागासोबत केंद्रीय निवडणूक आयोगाने बैठक घेतली होती.


केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मागील काही दिवसांपासून निवडणूक तयारीच्या अनुषंगाने सातत्याने बैठका सुरू आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासह आयोगाकडून प्रचार सभा, रॅली यांच्याबाबत मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. मोठ्या जाहीर सभांऐवजी, लहान सभा घेण्याचे निर्देश निवडणूक आयोग देऊ शकतो.


कोविड प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन केले तरच या छोट्या रॅली काढता येतील. दोन्ही डोस लागू केलेल्या लोकांना मेळाव्यात घेण्याचे आवाहन पक्षांना करता येईल. त्याशिवाय, निवडणूक-मतदानाच्या कामात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची चिंता निवडणूक आयोगाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies