Type Here to Get Search Results !

आधारला मोबाईल क्रमांक लिंक कशासाठी आवश्यक आहे? : वाचा सविस्तरआटपाडी : आधारला मोबाईल लिंक असल्याने इतर कुणी आपल्या आधारच्या माहितीचा दुरुपयोग करू शकत नाही, कारण त्याची अद्ययावत माहिती लगेच आपल्या मोबाईल येते, त्यामुळे आपली फसवणूक होत नाही, आधारमध्ये बरेचशे बदल आधार OTP ने स्वतःच ऑनलाईन करून घेणे शक्य होते, PAN कार्ड, Driving License, Passport इ. काढण्यासाठी आधारला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे, 


शासनाच्या बऱ्याच योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आधारला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक असते. जसे कि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी   (मार्च २०२२ पासून पुढील हफ्त्यासाठी Ekyc आवश्यक केले आहे ) , इ-श्रम कार्ड, विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरणे, रिक्षाधारकांचे अनुदान किंवा भविष्यात येऊ घातलेल्या इतर योजना इ.,EPFO च्या सर्व सदस्यांना त्यांचे UIN (EPF खाते) आधारला लिंक करावयास सांगितले आहे आणि ते करण्यासाठी आधी आधारला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे.


सांगली जिल्ह्यातील सर्व जनतेने जवळ्च्या पोस्ट ऑफ़ीसशी अथवा आपल्या पोस्टमनशी संपर्क साधावा व या सेवेचा ह्या विशेष मोहिमे दरम्यान जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहनही रुपेश सोनावले, प्रवर अधिक्षक, डाकघर सांगली विभाग, सांगली यांनी केले आहे.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies