कोरोनाचे महासंकट संपूर्ण जगासमोरील मोठे आव्हान ठरले आहे. गेली दोन वर्ष या विषाणुने मानवजातीला वेठीस धरले असताना चीनमधील एक भीषण वास्तव जगासमोर आले आहे. चीनने कोरोना रुग्ण शून्यावर आणण्याची योजना आखली आहे. याच योजनेचा एक भाग म्हणून कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना सक्तीने लोखंडी बॉक्समध्ये डांबले जात आहे.
या अमानुष नियमाचा पर्दाफाश आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केल्यानंतर संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. कोरोनाच्या नावाखाली चीनमधील सर्वसामान्य नागरिकांवर सुरु असलेल्या अत्याचाराने जग हादरले आहे. कोरोनामुक्तन देश करण्याचा प्रयत्न सध्या चीनमध्ये सुरु आहे. यामुळेच कोरोनाची रुग्ण संख्या शून्यावर आणण्यासाठी या देशाची धडपड सुरु आहे. यासाठी आता कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना विलगीकरणाच्याा नावाखाली जबरदस्तीेने लोखंडी बॉक्स मध्ये ठेवले जात आहे. चीनमधील शांक्सीस प्रांतातील एक व्हिडीओ समोर आल्या्नंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे.