बंगळूर : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिध्द कंपनी इन्फोसिसने ३१ डिसेंबर २०२१रोजी संपलेल्या तीन महिन्यांत ५,८०९ कोटींचा नफा नोंदवला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील नफ्यापेक्षा १२ टक्के अधिक आहे. यानंतर इन्फोसिसने आयटी क्षेत्रातील फ्रेशर्संना एक खुशखबर दिली आहे. इन्फोसिसने २०२२ या नवीन आर्थिक वर्षात ५५ हजार फ्रेशर्सची भरती करण्याची योजना केली आहे.
इन्फोसिसचे मुख्य वित्त अधिकारी निलांजन रॉय यांनी म्हटले आहे की, कंपनीच्या विकासात गुंतवणुकीला प्राधान्य देणे सुरूच आहे. कंपनीचे सीईओ आणि एमडी सलिल पारेख यांनी अधिक माहिती देताना म्हटले आहे की, कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यावर भर दिला जाणार आहे. त्या अंतर्गत, आम्ही आमच्या ग्राहकांची प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी कार्यक्षमतेवर अधिक लक्ष केंद्रीत आहोत. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे कल्याण हे आमचे प्राध्यान्य आहे.