Type Here to Get Search Results !

LPG Subsidy चे पैसे अकॉउंटमध्ये येत आहेत कि नाहीत ‘असे’ करा चेक


घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर सतत वाढत आहेत. दर महिन्याला नवीन दर लागू झालेले असतात. त्यामुळे त्यावर मिळणारी सबसिडी घरच्या खर्चाला दिलासा देणारी असते. परंतु ही सबसिडी आपल्या बँक अकॉउंटमध्ये येते का नाही हे कधी कधी समजत नाही. जर तुमच्या अकॉउंटमध्ये सबसिडीचे पैसे येत नसतील तर तुम्ही तक्रार देखील दाखल करू शकता.  


घरगुती एलपीजी सिलेंडरची सबसिडी तुमच्या बँक अकॉउंटमध्ये येत नसल्यास तुम्ही टोल फ्री नंबरवर कॉल करून तक्रार करू शकता.यासाठी 18002333555 हा टोल फ्री नंबर वापरा. यावर सबसिडी संबंधित तुम्हाला इतर तक्रारी देखील करता येतील. पंरतु तक्रार करण्याआधी सबसिडी अकॉउंटमध्ये येत आहे कि नाही याची माहिती घ्यावी. 


एलपीजी सबसिडीच स्टेट्स कसे  चेक करायचे?

सर्वप्रथम http://mylpg.in/ या वेबसाईट वर जा.  

इथे तुमचा 17 अंकी LPG ID दिल्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर सबमिट करा.  

कॅप्चा कोड टाकून पुढे कंटिन्यू करा.  

त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.  

पुढील पेजवर तुमचा ई-मेल आयडी लिहून पासवर्ड जेनरेट करा. 

ई-मेल वर एक अॅाक्टीवेशन लिंक येईल, त्यावर क्लिक करा, लिंक क्लिक करताच तुमचं अकॉउंट अॅीक्टिव्हेट होईल. 

अकॉउंट क्रिएट झाल्यावर तुम्ही mylpg.in वर जाऊन लॉग-इन करा. 

जर तुमचं आधार कार्ड LPG अकॉउंटशी लिंक असेल तर त्यावर क्लिक करा.  

त्यानंतर View Cylinder Booking History/subsidy transferred पर्याय बघा. 

इथे तुम्ही तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या सबसिडीची माहिती मिळवू शकता.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies