Type Here to Get Search Results !

“या” नेत्याचा ठाकरे सरकारला इशारा ; अजुन एक घोटाळा बाहेर काढणार...


आटपाडी : राज्यांमध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यापासून विरोधी पक्ष भाजप कडून घोटाळ्यांची मालिका चालू आहे. यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदावरून पायउतार व्हावे लागले व तुरुंगाची हवा खावी लागली. तर माजी वनमंत्री संजय राठोड यांनाही राजीनामा द्यावा लागला होता.


हे सर्व घोटाळे बाहेर काढण्यामागे भाजपचे चाणक्य समजले जाणारे नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे आघाडीवर होते. त्यांनी राज्यांमध्ये अनेक ठिकाणी दौरे करत अनेक मंत्र्यांचे, आमदार, खासदार यांचे घोटाळे बाहेर काढत, ठाकरे सरकारला ‘सळो कि पळो’ करून सोडले आहे.



आता पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांनी ट्विट करून ठाकरे सरकारला इशारा दिला असून राज्यामध्ये कोविड  काळात झालेला घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा देऊन पुन्हा एकदा किरीट सोमय्या प्रकाशझोतात आले आहेत. किरीट सोमय्या आत्ता नेमका कोणाचा घोटाळा बाहेर काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies