Type Here to Get Search Results !

आटपाडीतील रणरागिणींनी केले कळसूबाई शिखर सरआटपाडी : आटपाडीतील साहसी महिलांनी सह्यगिरी ट्रेकर्स सांगली यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या व महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाणारे कळसूबाई शिखर यशस्वी रित्या सर केले. शिखरावर जाताना अतिशय अवघड व दुर्गम असणारी वाट आपल्या पायाखाली तुडवत ५० रणरागिनींनी मोहिमेत हिरिरीने सहभाग घेतला होता. यामध्ये आटपाडीतून  तेजस्विनी गायकवाड, वैशाली राक्षे, मनिषा चव्हाण, अनिता कदम, अनिता पाटील, मंगल गुरव, आशा माळी, दिपाली देवकर, विजयश्री वाघमारे, दिपाली स्वामी, भावना विभूते, मंगल विभूते, वनिता देशमुख, अंजली नामदास, डॉ.प्रतिक्षा नामदास, लक्ष्मी जाधव, नीता सुर्वे, मनिषा मोरे, वैशाली माने या महिलांनी भाग घेतला.१६४६ मीटर उंचीचे हे शिखर महिलांनी सर केले. या ट्रेक मध्ये त्यांना सह्यगिरी ट्रेकर्स सांगली  चे वैभव बंडगर, अजित पाटील, युवराज साठे, दिलीप गोसावी यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. सर्व महिलांच्या या धाडसी कर्तृत्वाने  ‘हम भी कुछ कम नही’ याप्रमाणे कार्यकर्तृत्व सिद्ध केल्याने सर्वांकडून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies