Type Here to Get Search Results !

महाडिबीटी प्रणालीवर अर्ज भरण्यास "या" दिनांका पर्यंत मुदतवाढ




सांगली : अनुसूचित जाती प्रवर्गातील सन 2021-22 मधील नुतनीकरण व नवीन अर्जदारांसाठी अर्ज भरण्याकामी दि. 31 जानेवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे अद्याप प्रलंबित असल्याने शासनाने शिष्यवृत्ती, फ्रीशिप, आरएसएमएस, निर्वाह भत्ता या योजनेकरीता महाडिबीटीप्रणालीवर अर्ज भरण्याकरिता दि. २८ फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तरी या योजनेकरीता विद्यार्थ्यांनी www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.



तसेच सन 2021-22 मध्ये महाडिबीटी प्रणालीमध्ये नुतनीकरण अर्ज भरताना नुतनीकरण करणाऱ्या ‍विद्यार्थ्यांनी कोणताही नवीन युझर आयडी क्रिऐट न करता गतवर्षीचा आधारबेस युझर आयडी वापरूनच चालू वर्षाचे नुतणीकरणाचे अर्ज भरून घ्यावेत. एकही मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहणार नाही याची सर्व महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies