आटपाडी : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून शिक्षक बँक सभागृह आटपाडी येथे इयत्ता पाचवी ते आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता धारक व नवोदय पात्र विद्यार्थी तसेच सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र व क्रीडा क्षेत्रामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या शिक्षक बंधू भगिनी यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षकांच्या आरोग्याविषयी काळजी घेणारे आयुर्वेदिक औषधांचा खजिना या वरती डॉ उमेश कदम यांचे व्याख्यान ही आयोजित केले. या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय मनोगतामध्ये राज्य शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मौलिक मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे युवा नेते जयवंत सरगर, उपसभापती दादासाहेब मरगळे, शिक्षक बँक चेअरमन यु..टी.जाधव, मार्केट कमिटी संचालक विष्णुपंत अर्जुन, युवा नेते विनायक पाटील, ज्येष्ठ नेते शिवाजीतात्या पाटील, राज्य कार्याध्यक्ष किरणराव गायकवाड, पार्लमेंटरी बोर्ड सचिव शशिकांत भागवत, संचालक शशिकांत बजबळे, संचालक रमेश पाटील, मुख्याध्यापक श्री. गाजरे, श्री. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष संजय कबीर यांनी केले, सदर कार्यक्रमास तालुक्यातून मोठ्या संख्येने शिक्षक बांधव व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्याम ऐवळे, आदर्श शिक्षक हैबत पावणे, अजय राक्षे, दीपक कुंभार, रमेश विभुते, रमेश हेगडे, बाळासाहेब साळुंखे, यशवंत मोरे, विठठलपंत माळी, प्रवीण बाड, संतोष क्षीरसागर, सत्यवान माने, भास्कर डिगोळे, इंताब इनामदार, सचिन सासणे, महिला आघाडी अध्यक्षा संगीता कुंभार, योगिता शिंदे, अनिता जाधव, कविता डोंबाळे, आक्काताई हेगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सरचिटणीस नानासाहेब झुरे यांनी केले.