Type Here to Get Search Results !

विशेष शिबीरे घेऊन "या" समाजाच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न निकाली काढावा : मंत्री विश्वजीत कदम यांचे विभागास निर्देश



मुंबई : राज्यातील काही भागात असलेल्या गोसावी समाजाच्या जुन्या नोंदी नसतील तरी इतर पुराव्यांच्या आधारावर जात प्रमाणपत्र देता येईल काय या विषयी पडताळणी करुन जात प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात यावे असे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिले. गोसावी समाजाच्या समस्या समजून घेण्यासाठी आज मंत्रालयात या समाजातील काही सदस्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती जयश्री मुखर्जी, बार्टी चे महासंचालक धम्मजोती गजभिये व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



डॉ. कदम पुढे म्हणाले,  राजस्थानी आणि गुजराती सारखी मेवाडी भाषा बोलणारा हा समाज पाल टाकून राहणारा आणि देशभ्रमण करत पोट भरणारा समाज आहे. या समाजात अनेक पोट जाती देखील आहे. त्यापैकी काही विशिष्ट पोटजाती वगळता इतर समाजास शासनाच्या योजनांचा लाभ घेतांना अडचणी येतात. या सर्व अडचणींवर  योग्य तो मार्ग काढण्यासाठी ज्या भागात या समाजातिल लोकसंख्या जास्त आहे अशा ठिकाणी महसूल यंत्रणा व सामाजिक न्याय विभागाच्या  माध्यमातून विशेष शिबीर आयोजित करावे.



भटक्या जमातीतील समाजासाठी ज्यांच्याकडे जुने रहिवासाचे पुरावे नाहीत त्यांच्यासाठी गृहविभागा मार्फत केलेल्या चौकशीच्या आधाराने प्रमाणपत्र देण्याचा पर्याय आहे, यासारख्या  या समाजाला दिलेल्या अधिकार आणि सवलतींबाबत जागृकतेचा अभाव आहे,  अशी माहीती अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती मुखर्जी यांनी दिली. राज्य मागास आयोगामार्फत या जातिचे सर्वेक्षण व्हावे या मागणीसाठी पाठपुरावा होणे आवश्यक असल्याचे बार्टीचे डॉ. गजभिये यांनी यावेळी सांगितले.  



या बैठकीला अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघाचे बाबासाहेब चव्हाण, अप्पासाहेब जाधव, अनिल जाधव, संतोष मोरे, जालिंदर जाधव, आकाश जाधव, राजेश जाधव, प्रदिप पडियार, राजेश पवार हे प्रतिनिधी उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies