Type Here to Get Search Results !

कुत्र्यांचा 10 वर्षीय मुलीवर प्राणघातक हल्ला; मुलगी गंभीर जखमी!



नागपूर : जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात दहा वर्षाच्या मुलीवर कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केला. काचुरवाही  येथे ही अत्यंत धक्कादायक घटना घडली. हंसिका गजभिये हि मुलगी घराजवळील शेतात सायकलने गेली असता 5 कुत्र्यांच्या कळपाने तिच्यावर हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. तिला लगेच रामटेकचा योगीराज राधाकृष्णा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. 


तिची गंभीर स्थिती बघता तिला नागपूरच्या राधाकृष्णा हास्पिटलमध्ये हलविण्यात आले. आता तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळले. कुत्रा हा पाळीव प्राणी आहे. पण, कधीकधी हेच कुत्रे धोकादायक ठरतात. रामटेकमध्ये अशीच एक भयानक घटना घडली. या घटनेत पाच कुत्र्यांच्या घोळक्याने निरागस मुलीवर हल्ला चढविला. तिला गंभीर जखमी केले. आता नागपुरातील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.



विशेष बाब म्हणजे हंसिका आईवडिलांना एकुलत एक अपत्य आहे. ती गावचा शाळेत 4 थ्या वर्गात शिकत आहे. कुत्र्यांनी एवढा मोठा प्राणघातक हल्लामध्ये तिच्या डोक्यावर, चेह-यावर, पोटावर, मांडीवर, पायावर हल्ला केला. तिचे आपरेशन करून सर्जरी करावे लागेल. तिला बरे  होण्याकरिता जवळ-जवळ 6 ते 7 महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे   डॉक्टरांनी  सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies