Type Here to Get Search Results !

५७० लिटर भेसळयुक्त दूध जप्त...!

 


मुंबई : दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन कारवाई करीत असते. मात्र तरीही मुंबईत भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याचे एफडीएच्या कारवाईतून निदर्शनास आले. एफडीएने सांताक्रूझ येथे छापा टाकून ५७० लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले. या दुधाची किंमत २६ हजार ९२२ रुपये आहे.



एफडीएच्या मुंबई विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ येथील मेसर्स नागराज सैदालु मेडाबोनिया, रूम नंबर ३२, वाकोला ब्रिज, लोखंडवाला चाळ येथे १७ मार्चला छापा घातला. येथून ५७० लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले. या दुधाची किंमत २६ हजार ९२२ रुपये आहे. गोवर्धन फ्रेश, गोवर्धन टी स्टार आणि गोवर्धन गोल्ड) दुधाचा यात समावेश आहे. दुधाच्या पिशव्यांमध्ये पाणी भरून त्या पुन्हा बंद करून भेसळयुक्त दूध ग्राहकांना विकले जात असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त, बृहन्मुंबई, शशिकांत केकरे यांनी दिली. जप्त दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून अहवालानंतर पुढील कारवाई करणार असल्याचेही केकरे यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies