Type Here to Get Search Results !

गोपीचंद पडळकर यांच्यावर अमोल मिटकरी यांचा हल्लाबोल म्हणाले.......

 



अमरावती : गोपीचंद पडळकर यांचा बोलविता धनी दुसरा तिसरा कोणी नसून भाजप आणि देवेंद्र फडणवीस आहे. माझा स्पष्ट आरोप आहे आणि ते वास्तव आहे, असा घणाघात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. गोपीचंद पडळकर ही व्यक्ती नाही ती एक प्रवृत्ती आहे. गोपीचंद पडळकर  यांच्या मागचा बोलवता धनी कोण आहे हे शोधले पाहिजे. एकतर हे देवेंद्र फडवणीस यांचा इशाऱ्यावर चालले आहेत. नाहीतर ते शांतपणे ऐकत आहे. ज्या व्यक्तीने विधिमंडळात माझ्यावर किती गुन्हे आहे, याची जाहीर कबुली दिली. ज्या व्यक्तीवर 90 हजारांची सोनसाखळी चोरण्यासारखे गंभीर गुन्हे आहे. अशी व्यक्ती जर चोरून-लपून अहिल्याबाईंच्या शिल्पाचा अनावरण करत असेल तर ते चुकीचे आहे, असेही मिटकरी म्हणाले. राज्यांमध्ये उच्छाद मांडणाऱ्या लोकांचा बंदोबस्त केल्याचा इतिहास आहे. अहिल्याबाईंचा इतिहास आहे. उच्छाद मांडणाऱ्या सूरजमल जाटांचा त्यांनी बंदोबस्त केला. आज अहिल्याबाई असत्या असा उच्छाद मांडणाऱ्याचा अहिल्याबाईनी बंदोबस्त केला असता, असेही ते म्हणाले.



शरद पवारांचे जे धोरण होते  हे वाचायला आणि कळायला यांना फार वेळ लागणार आहे. मी देवेंद्रजींना सांगतो. आमचा विरोध त्या व्यक्तीला नाही प्रवृत्तीला आहे. पंतप्रधान शरद पवारांना मानतात. त्या शरद पवारांना विरोध करण्यासाठी फक्त पडळकर यांना आमदारकी दिली आहे. गोपीचंद पडळकर यांनी आमदारकी कल्याणासाठी लावावी फालतू स्टंटबाजी करू नये. स्वतःच्या गाडीवर दगडफेक करून घ्यायची ही व्यक्ती नाही प्रवृत्ती आहे. अशा टोपीचंदनला जनता भीक घालत नाही. पवार साहेबांवर टीका केली की मीडियात स्थान मिळते, त्यासाठी पडळकर हे हपापलेले आहेत.



2 एप्रिलला उद्घाटन होणार आहे. शरद पवार उद्घाटन करणार आहे. अहिल्याबाईंचा आदर्श आमच्यासाठी आहे. जेव्हा सावित्रीबाई ज्योतिबाचा अपमान होतो तेव्हा कोणी बोलत नाही. आता यांना पुळका यायला लागला का? गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांना अडवण्याचा प्रयत्न करू नये. सांगली महानगरपालिकेने रीतसर त्यांना बोलावलेले आहे. गोपीचंद पडळकर यांचा बोलविता धनी दुसरा तिसरा कोणी नसून भाजप आणि देवेंद्र फडणवीस आहे. माझा स्पष्ट आरोप आहे आणि ते वास्तव आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर बेकायदेशीर नोटीस देऊन खोटे गुन्हे दाखल केले. आम्ही शांत राहू असे नाही. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था आहे. असे हि ते म्हणाले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies