Type Here to Get Search Results !

"ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातला फरक कळत नाही तर यासारखे दुर्दैव नाही,” ‘हे’ भाजप आमदार संतापले!

महाराष्ट्र: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी डोंबिवली शहराच्या विविध भागात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणारे १५ फलक लावले आहेत. या फलकांवर शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांचा फोटो लावल्याने खळबळ उडाली आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातील फरक शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांना कळतो की नाही, अशी टीका दिवसभर अनेकजणांकडून केली जात होती.महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबतीने राज्याच्या कारभारात सामील झाल्यापासून शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडत असल्याची ही लक्षणे आहेत, तसेच या फलकावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची छायाचित्रे असल्याने कमीत कमी त्यांनी फलक लावण्यापूर्वी फलकावरील कच्चा मजकूर नजरेखालून घालणे आवश्यक होते, असे भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.“शिवसेना पूर्वीपासून डोंबिवलीत शिवजयंती उत्सव साजरी करते. परंतु शिवसेनेविषयी निष्ठा नसलेली, हिंदुत्वाचा अभिमान नसलेली अशी उसनी माणसे पक्षात आली की अशा चुका घडण्यास सुरुवात होते. ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातला फरक कळत नाही ते जर शिवसेनेचे शहरप्रमुख असतील तर यासारखे दुर्दैव नाही,” अशी जोरदार टीका भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.दरम्यान,“जे कधीच शिवजयंती साजरी करत नाहीत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती विषयी बोलू नये. डोंबिवली शहरात शिवसेनेने शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांना अभिवादन करणारे १५ फलक लावले आहेत. प्रत्येक फलकावर महाराजांचा वेगळ्या प्रकारचा फोटो लावला आहे. फक्त एका फलकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लहान आणि संभाजी महाराजांचा फोटो मोठा झाला आहे, फार मोठी चुकी आमच्याकडून झालेली नाही. नजरचुकीने हा प्रकार घडला आहे. त्याचे कोणीही भांडवल करू नये”असे, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले आहे.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies