Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीची मोठी कारवाई!



महाराष्ट्र: राज्यात ईडीकडून सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई केली जात असल्याची टीका सतत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज ईडीने मोठी कारवाई करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे म्हणजेच,रश्मी ठाकरे यांचे बंधु श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ठाण्यातल्या वर्तक नगर भागातील ‘निलांबरी’ अपार्टमेंटमधील एकूण ६ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. या सदनिका आणि एकूण जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची किंमत अंदाजे ६ कोटी ४५ लाख रुपये असल्याची माहिती समोर येत आहे.


तसेच, यासंबंधित ईडीकडून माहिती देण्यात आली आहे. ईडीकडून आज पुष्पक ग्रुपची एक कंपनी असलेल्या पुष्पक बुलियनच्या माध्यमातून श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिडेटनं खरेदी केलेल्या ११ सदनिका ताब्यात घेण्यात आल्या आहेत. साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार,नंदकिशोर चतुर्वेदी नावाचा एक एंट्री ऑपरेटर असून त्याच्या माध्यमातून ३० कोटींचे कर्ज साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड यांना शेल कंपन्यांच्या माध्यमातून ट्रान्सफर केले गेले. त्याच पैशातून या ११ सदनिकांची खरेदी केली गेली, अशी माहिती उघडकीस आली आहे. त्याचप्रमाणे, भविष्यात श्रीधर पाटणकर यांचीसुद्धा ईडीच्या माध्यमातून चौकशी होण्याची शक्यता दाखवण्यात येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies