चोरीचे डिझेल पकडलेल्या बोटी आगीत जळून खाक!

नवी मुंबई: नवी मुंबईत चोरीचे डिझेल पकडलेल्या बोटींना आज सकाळी आग लागली आणि या आगीत बोटी जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाने आग विझवण्याचे खूप प्रयत्न केले परंतु, बोटींना चारही बाजूंनी सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या टायरमुळे आग विझवली तरी पुन्हा सतत ती वाढतच होती.बकायादेशीर डिझेल चोरून विक्री करण्याऱ्या टोळीला अटक करण्यात आली होती तर जप्त करण्यात आलेल्या दोन बोटी या एनआरआय पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या उरण उड्डाणपुलाखाली खाडीत लावण्यात आलेल्या होत्या. या दोन्ही बोटींना आज  सकाळी ७ च्या सुमारास अचानक आग लागली. या बोटीतील २१ हजार ४७० लिटर डिझेल आधीच काढून ठेवल्याने खूप मोठी दुर्घटना टळली आहे.तसेच मिळालेल्या माहितीनुसार,या बोटीतील बॅटरीमध्ये स्पार्क होऊन कदाचित आग लागली असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.परंतु,  हि आग लावण्यात आली किवा कशाने हि आग लागली याची चौकशी सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी दिली आहे.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured