Type Here to Get Search Results !

“या” बॉलिवूड अभिनेत्रीची करोना चाचणी पॉझिटिव्ह; मुंबईतील घर केले सील!





मुंबई: देशात सध्या करोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. परंतु, आजही लोकाना कोरोनाचे संक्रमण होताना दिसत आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी आतापर्यंत करोना व्हायरसची लागण  झाली आहे. आता अभिनेत्री लारा दत्ताची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हि माहिती काही रिपोर्ट्सच्या माध्यमातून उघडकीस आली आहे.



प्राप्त माहितीनुसार, लारा दत्ताला करोना व्हायरसची लागण झाली आहे. तसेच, मुंबई महानगरपालिकेने लारा दत्ता या अभिनेत्रीचे मुंबईतील घर सील केले आहे. आणि महानगरपालिकेने लाराच्या मुंबईतील घराबाहेर मायक्रो कंटेनमेंट झोनचे पोस्टर लावले आहे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबात लारा दत्ता एकटीच करोना संक्रमित झाली आहे. परंतु याबद्दल तिने अधिकृत माहिती दिलेली नाही.



लारा दत्ता हि शेवटची बेल बॉटम चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार, वाणी कपूर आणि हुमा कुरैशी यांच्या मुख्य भूमिका होत्या.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies