Type Here to Get Search Results !

राज्य सरकारच्या निर्णयामुळे सीएनजी आणि पीएनजी स्वस्त: होणार!

 




महाराष्ट्र: उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी  अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या निर्णयानुसार सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा दर १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्के इतकि घात करण्यात आली आहे. याबद्दल  शुक्रवारी म्हणजेच काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अधिसूचना चालू करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने चालू केलेल्या अधिसूचनेप्रमाणे १ एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार आहे.



राज्य सरकारच्या सीएनजीवरील कर कमी करण्याच्या निर्णयाचा फायदा ऑटोरिक्शा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे. प्रदुषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा आहे. सीएनजीचे कमी झालेले नवे दर १ एप्रिल २०२२ पासून लागू होणार आहेत.



तसेच, सीएनजी तसेच पीएनजीवरील मूल्यवर्धित कर कमी करण्याची मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता सीएनजी आणि पीएनजी स्वस्त: होणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies