Type Here to Get Search Results !

सिगारेट पेटवत विषारी सापाजवळ पोहोचली अन...; बघा हा व्हायरल व्हिडीओ!





सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी विषारी साप हातात धरताना दिसत आहे.



तरुणीचा व्हायरल व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्सच्या विचारात पडला आहे. साप म्हटले तरी आपल्याला  घाम फुटतो. अशा सापाला पकडने दूर आपण त्याच्या जवळ जाण्याचीही हिंमत करणार नाही. पण एका तरूणीने तशी हिम्मत केली आहे. एका हाताने सिगारेट ओढत दुसऱ्या हाताने चक्क सापाला पकडण्याचा प्रयत्न करतेय. हे दृश्य पाहून बघणारे फक्त  बघतच राहिले.








व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये, रस्त्यावर एक विषारी साप पडलेला दिसत आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तेवढ्यात अचानक एक मुलगी तिथे येते. ही मुलगी एका हाताने सिगारेट ओढताना दिसत आहे. समोर विषारी साप असूनही ही मुलगी चिल मूडमध्ये दिसून येत आहे. सिगारेट ओढत ही मुलगी वेगाने सापाला तोंडाशी धरते आणि उचलते. यावेळी तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती दिसून आलेली  नाही. सापाला पकडून ती रस्त्याच्या किनारी सोडताना दिसून येते आहे.हा व्हिडीओ पाहिल्यानंतर  युजर्स कमेंट करत आहेत आणि महिलेच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies