Type Here to Get Search Results !

मीरा-भाईंदरमध्ये ‘स्केटिंग पार्क’ची निर्मिती; दोन कोटींचा खर्च अपेक्षित!




भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील आरक्षण क्रमांक ९४ येथे ‘स्केटिंग पार्क’ची निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी  दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित असून प्रथम टप्प्यात पालिकेला राज्य शासनाकडून ७५ लाख रुपये देण्यात आले आहेत.



आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवलेले अनेक खेळाडू या शहरातले आहेत. त्यामुळे भाईंदर पूर्व येथे पालिकेने स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची निर्मिती करून विविध खेळांना प्रोत्साहन दिले आहे. सध्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करून कुस्तीचा आखाडा विकसित करण्याच्या दृष्टीने पालिकेने हि जोरदार पावले उचलली आहेत. तसेच, स्केटिंग क्षेत्रात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या खेळाडूंसाठी भाईंदर पश्चिम येथे पालिकेकडून ‘स्केटिंग पार्कची’देखील निर्मिती करण्यात येत आहे.  या प्रकल्पासाठी दोन कोटींचा खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात आमदार गीता जैन यांच्या निधीतून शासनाने ७५ लाख रुपये महानगरपालिकेला दिले आहेत.  येत्या वर्षभरात स्केटिंग पार्कची निर्मिती होईल, अशी शक्यता वर्तवन्यात येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies