Type Here to Get Search Results !

बायकोशी भांडण करून स्वतःच पेटवले घर; सिलेंडरचा स्फोट झाल्याने भडकली आग!

 


सोलापुरातील अंबिका नगर, नक्का वस्ती येथील राहत्या घरात पत्नीला मारहाण करून हाकलून दिल्यानंतर स्वतःच्या घराला पतीने आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या आगीत घरातील सर्वच साहित्य जळून खाक झाले असून जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले आहे. श्यामसुंदर भंडारी असे घर पेटवून देणाऱ्या पतीच नाव आहे.


या आगीमध्ये घरातील गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याने ही आग वाढतच गेली होती, मात्र योग्यवेळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात आली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या घरात चार-पाच दिवसांपासून भांडण सुरू होते. एकेदिवशी श्यामसुंदर भंडारीने पत्नीला मारहाण करून हाकलले आणि त्यानंतर घराला आग लावली. हा व्यक्ती घरात आग लागून निघून गेला, त्यानंतर गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि परिसरात खळबळ उडाली, असे शेजाऱ्यांनी सांगितले.



दरम्यान, भंडारी यांच्यामुळे घरातील लोकांना त्रास होत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी दिली. त्यांच्या घरातील भांडणाचा त्रास होत असून तो पत्नी आणि मुलांना मारहाण करत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies