Type Here to Get Search Results !

नाच कासवाचा; एकदाच बघा "हा" व्हायरल व्हिडीओ!
आटपाडी: सोशल मिडीयावर रोज मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक कासवाचा नाचातानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.  कासवाची मंद, शांत प्राणी अशी ओळख आहे. छोटासा आवाज जरी झाला तरी घाबरून जाणारे कासव गाण्यावर नाचत आहे, याच्यावर विश्वासच बसने अवघड आहे.  परंतु हे खरे आहे. एका कासवाने गाण्यावर धमाकेदार आपला नाच दाखवत परफॉर्मन्स दिला आहे. 


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, एका टबमध्ये कासव आपल्या दोन्ही पायांवर नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ ज्यांनी पाहिला त्यांना आपले हसू आवरता येत नाही. या व्हिडीओने सोशल मीडियावर खर तर जोरदार राडाच केला आहे. 


व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका टबमध्ये एक कासव बसलेले दिसत आहे. मुळात हे कासव टबमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. यावेळी टबमधून बाहेर पडण्यासाठी हे कासव आपल्या लहान पायांना इकडे-तिकडे झटके मारू लागतो. पहिल्या नजरेत टबमध्ये कासव नाचत असल्याचे वाटू लागते. परंतू कासव नाचत नसून तर टबमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. कासवाचा हा मजेशीर नाच पाहून प्रेक्षक स्वतःला हसण्यापासून रोखू शकत नाहीत.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies