Type Here to Get Search Results !

रशियाच्या बॉम्बहल्ल्यानंतर मारियुपोलच्या थिएटरमध्ये मृतांचा खच



रशियाचे युक्रेनवर आक्रमकपणे हल्ल सुरुच आहेत. मारियुपोल या बंदराच्या शहरातील एका थिएटरवर झालेल्या बॉम्बहल्ल्यात सुमारे ३०० नागरिक ठार झाल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात या थिएटरवर रशियन सैन्याने एअर स्ट्राइक केला होता. याबाबत मारियुपोल शहरातील युक्रेनियन अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले की, थिएटरमध्ये शेकडो लोकांनी आश्रय घेतला होता. पण रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यात यातील सुमारे ३०० लोकांचा मृत्यू झाल्याची भिती आहे.


रशियन विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यानंतर मारियुपोलच्या ड्रामा थिएटरमध्ये सुमारे ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे,” आतापर्यंत, मृतांचा निश्चित आकडा पुढे आलेला नाही. उद्ध्वस्त इमारतीचा ढिगारा आणि सततच्या गोळीबारामुळे जीवितहानीची माहिती घेणे अधिकाऱ्यांना कठीण झाले आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रशियाने केलेल्या हल्ल्यात थिएटरमध्ये आश्रय घेतलेल्या शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यात शहरातील या थिएटरवर हल्ला करण्यात आला होता. ज्यावेळी थिएटरवर हल्ला झाला त्यावेळी आत मोठ्या संख्येने लोक होते. सिटी कौन्सिलच्या  अंदाजानुसार तसेच बीबीसी आणि ह्युमन राइट्स वॉच गटाने  घेतलेल्या नागरिकांच्या मुलाखतीनुसार, हल्ल्याच्या काही दिवस आधी या थिएटर इमारतीमध्ये ५०० ते १ हजार लोकांनी आश्रय घेतला होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies