Type Here to Get Search Results !

औषधांच्या किंमतीत १ एप्रिलपासून १०.७ टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या सविस्तर माहिती...

 



नवी दिल्ली:  देशात पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असून एलपीजी आणि सीएनजीचे दरही वधारले आहेत. आता जीवनावश्यक औषधांची खरेदी करणाऱ्यांनाही महागाईची झळ बसण्याची शक्यता आहे. १ एप्रिलपासून ८०० हून अधिक जीवनावश्यक औषधांच्या किंमतीत १०.७ टक्के वाढ होणार आहे.


ताप, हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्वचारोग आणि अशक्तपणा इत्यादींवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेनकिलर आणि पॅरासिटामॉल, फेनिटोइन सोडियम, मेट्रोनिडाझोल यासारख्या अत्यावश्यक औषधांचा त्यात समावेश आहे. केंद्र सरकारने शेड्यूल औषधांच्या किंमती वाढवण्यास परवानगी दिली आहे. 


नॅशनल फार्मा प्राइसिंग अथॉरिटी  नुसार, घाऊक किंमत निर्देशांकात वाढ झाल्यामुळे औषधांच्या किंमतीत वाढ करण्यात येत आहे. कोरोना महारोगराईपासून औषध उद्योग सातत्याने औषधांच्या किमती वाढवण्याची मागणी करीत होते. शेड्यूल ड्रग्स अत्यावश्यक औषधांच्या श्रेणीत येतात आणि अत्यावश्यक औषधांच्या श्रेणीमुळे सरकार त्यांच्या किंमती नियंत्रित करते. परवानगीशिवाय त्यांच्या किंमती वाढवता येत नाहीत. परंतु, आता सरकारने या औषधांच्या किंमती वाढवण्यास परवानगी दिल्याने आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies