Type Here to Get Search Results !

वायुप्रदूषणाचा परिणाम; मुंबईतील ९१०० नागरिकांचा मृत्यू!
मुंबई : जगातील ६,४७५ प्रदूषित शहरांमध्ये मुंबई १२४व्या स्थानावर आहे. ‘आयक्यू एअर’ या संस्थेने मंगळवारी जाहीर केलेल्या २०२१च्या ‘जागतिक हवा गुणवत्ता अहवाला’तून हे उघडकीस आले आहे. तसेच, मुंबईत २०२०च्या तुलनेत २०२१ या वर्षांत ‘पीएम २.५’चे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे,  २०२१ मध्ये ९,१०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत मायक्रोग्रॅम घनमीटर हे   २०२१ साली प्रमाण ४६.४ मायक्रोग्रॅम घनमीटर एवढे झाले आहे. त्यामुळे मुंबई हे जगातील ६,४७५ प्रदूषित शहरांपैकी १२४व्या क्रमांकाचे शहर ठरले गेले आहे. नवी मुंबई ही मुंबईपेक्षा अधिक प्रदूषित असून ती ७१व्या स्थानी आहे. तसेच, चंद्रपूर ११३व्या,  पुणे १९६ व्या, नाशिक २१५व्या क्रमांकावर आहे.‘जागतिक आरोग्य संघटने’ने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ५ मायक्रोग्रॅम घनमीटर हे ‘पीएम २.५’चे आदर्श प्रमाण आहे. महाराष्ट्रातील शहरांतील प्रदूषण यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहे. वायुप्रदूषणाचा परिणाम म्हणून २०२१ या वर्षांत मुंबईतील ९ हजार १०० नागरिकांचा मृत्यू झाला असून वायुप्रदूषणाच्या परिणामांवर १ अब्ज ३० कोटी अमेरिकी डॉलर खर्च झाला आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies