सोमवारी २१ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास रविंद्र कांबळे यांनी पत्नी रेशमी हिच्याशी नेहमीप्रमाणे जोरदार भांडण केले. तसेच मुलगा अभिजीत याला देखील तू माझा मुलगा नाहीस असे त्याला हिणवले. याचा राग येवून मुलगा अभिजीत कांबळे याने घरातील लोखंडी हातोडा घेवून वडील रवींद्र कांबळे यांच्या डोक्याच्या मागील बाजुला जोरात मारला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लांजा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अभिजीत कांबळे याच्यावर कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
.
अल्पवयीन मुलाकडून वडिलांचा खून!
3/22/2022 08:58:00 pm
0
Tags