Type Here to Get Search Results !

राज्यात इंधन दरवाढीचा भडका; जाणून घ्या सविस्तर माहिती....


 


मुंबई :  देशात सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही आठवड्यापासून सातत्याने कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल, डिझेलचे दर वाढवले जातील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र दहा मार्चनंतर देखील काही दिवस इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. अखेर मंगळवारपासून इंधन दरवाढीला सुरुवात झाली असून, आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबईचा समावेश हा देशातील टॉप चार महानगरामध्ये होतो, मुंबईमध्ये देखील पेट्रोल दर वाढीचा भडका उडाला आहे. सलग दोन दिवस इंधनाच्या दरात झालेल्या वाढीमुळे शहरात पेट्रोल प्रतिलिटर 110. 97 रुपयांवर पोहोचले आहे. तर एक लिटर डिझेलसाठी मुंबईकरांना 95 रुपये मोजावे लागत आहेत. वाढत्या पेट्रोल,डिझेलच्या दरवाढीचा मोठा फटका हा मुंबईकरांना बसण्याची शक्यता आहे.



दरम्यान दुसरीकडे ठाण्यात देखील पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने उच्चांक गाठला आहे. आज झालेल्या इंधनदरवाढीनंतर ठाण्यात पेट्रोल 110. 82 तर डिझेल 95.14 रुपये झाले आहे. देशातील जवळपास सर्वच मेट्रो सीटीमध्ये पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies