Type Here to Get Search Results !

44 हजारांचा iPhone फक्त 28 हजारात खरेदीची सुवर्णसंधी!

 आटपाडी: अमेरिकन कंपनीने अॅपलने  सध्या आयफोन एसई 3 सादर केला आहे आणि आता या फोनवर सेलसोबतच ऑफर्सही सुरू करण्यात आल्या आहेत.या कंपनीने हा किफायतशीर स्मार्टफोन 43,900 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. पण हा फोन 28,900 रुपयाची खरेदी घेण्याची सुवर्ण संधी ग्राहकांना मिळत आहे. कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफरसह, ग्राहक 15000 रुपयांच्या डिस्काऊंटसह iPhone SE 3 खरेदी करू शकतो. परतू,   आपल्या लेटेस्ट स्मार्टफोनचे 64 GB व्हर्जन iStore वर 28,900 रुपयांमध्ये विकत आहे. 


एका इन्टरनेट वाहिनीच्या वृत्तानुसार, या फोनवर यूजर्सना 2,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट मिळू शकतो. कॅशबॅकचा लाभ घेण्यासाठी ICICI बँक, कोटक बँक आणि SBI क्रेडिट कार्ड तसेच डेबिट कार्ड या सगळ्याचा वापर करावा  लागेल. या फोनवर देण्यात आलेल्या सर्व ऑफर्स एकत्रित आणून  हा फोन 15,000 रुपयांपर्यंतच्या सवलतीत खरेदी करता येऊ शकतो . iPhone 8 64GB iStore वर एक्सचेंज ऑफरअंतर्गत खरेदी केला जाऊ शकतो. ही ऑफर फक्त iPhone S3 च्या 128GB आणि 256GB व्हेरियंटवर वैध आहे.


या आयफोनमध्ये 4.7 इंचाचा रेटिना एचडी डिस्प्ले आहे. फोन iOS 15 वर चालतो. स्मार्टफोनच्या डिस्प्ले आणि बॅक पॅनलवर एका टफ ग्लासचा वापर करण्यात आला आहे. तसेच, कंपनीने यामध्ये Bionic A15 चिपसेट वापरला आहे. हे  प्रोसेसर कंपनीने आपल्या iPhone 13 सिरीजमधील फोनमध्ये देखील वापरला गेला आहे .


या आयफोनमध्ये लाइव्ह टेक्स्ट फीचर्सही देण्यात आले आहेत, जे यूजर्ससाठी खूप उपयुक्त ठरू शकतो . या फोनच्या बॅक पॅनलवर 12 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या नवीन मॉडेलमध्ये सुधारित व्हिज्युअल प्रोसेसिंग दिसेल. मागील कॅमेरा 4K साठी डीप फ्यूजन आणि स्मार्ट HDR 4 ला सपोर्ट करत येतो  आणि तरीही 60fps वर फोटो क्लिक करतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये फेसटाइम एचडी कॅमेरासुद्धा  देण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies