Type Here to Get Search Results !

राशीभविष्य - २५ मार्च २०२२ I कसा असेल तुमचा आजचा दिवस I जाणून घ्यामेष : महत्वाच्या कामात यश मिळेल. भाग्याची चांगली साथ राहील. अडचणी दूर होतील. आशावादी दृष्टीकोन ठेवून कामे कराल, तर यश सहज मिळेल. 


वृषभ : मन शांत ठेवा. वाहने जपून चालवा. दगदग करु नका. आर्थिक आवाक चांगली राहील. महत्वाच्या कामांना खीळ बसल्यासारखे भासेल. काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. 


मिथुन : मन प्रसन्न राहील. नोकरीत तुमचा दबदबा राहील. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. कामे मार्गी लागतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. 


कर्क : थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. बोलताना कुणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक लाभ होईल. कामाचा ताण वाढेल. धावपळ करावी लागेल. महत्वाच्या कामात अडचणी येतील.


सिंह : कामे आटोक्यात येतील. लोकांच्या भेटीगाठी होतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. नोकरीतील अस्थिरता कमी होईल. मनाचा तोल ढळू देऊ नका. 


कन्या : तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. मात्र नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. तुमचे वर्चस्व राहील. घरी पाहुणे येतील. जोडीदार चांगली साथ देईल. 


तूळ : प्रवासाचे योग येतील. कामानिमित्त प्रवास घडून येईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात विक्री चांगली होईल. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. वादापासून दूर राहा. 


वृश्चिक : डोळ्यांची काळजी घ्या. उन्हात जास्त फिरू नका. आर्थिक बाजू बळकट राहील. अनेक मार्गांनी धनप्राप्ती होईल. जमिनीचे व्यवहार यशस्वी होतील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. 


धनू : आवडीचे पदार्थ खाण्यास मिळतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. विविध प्रकारचे लाभ होतील. 


मकर : जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. प्रवास करावा लागेल. महत्वाच्या कामात अडचणी येतील. मनावर थोडा ताण राहील. अनेकांचे सहकार्य मिळेल. भावंडांची भेट होईल. 


कुंभ : धनलाभाच्या दृष्टीने अत्यंत चांगला काळ आहे. घरात चैनीच्या वस्तू खरेदी कराल. मनासारखे भोजन मिळेल. पैशाचा ओघ चांगला राहील. विविध प्रकारचे लाभ होतील.


मीन : बदलीची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असेल तर संधी मिळेल. कामे मार्गी लागतील. नोकरीत दगदग होईल. कामाचा ताण राहील. कामाचे स्वरुप बदलेल. आर्थिक बाजू चांगली राहील. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies