मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला नवी गोष्ट घेने चांगले असते , असे मानले जातते . याचसाठी अनेकदा ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या वेगवेगळ्या जाहिराती बाजारात प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. परंतु सर्वात चर्चेत असणारे रिअल इस्टेटचे मार्केटमध्ये सध्या जाहिरातींमधून ग्राहकांना घरखरेदीसाठी आकर्षित ठरतील, अशा वेगवेगळ्या योजना, स्किम विकासकांकडून दाखवल्या जात आहेत.परंतु घरखदेरीला मिळणारा उत्साह कसा असेल, याकडे या संपूर्ण क्षेत्रातील जाणकारांची जोरात याकडे नजर लागली आहे.
कोरोना महामारी, लॉकडाऊन, रोजची पेट्रोल डिझेलची दरवाढ वाढती महागाई तसेच, जीएसटी, महारेरा या सगळ्याचाही परिणाम घरखरेदीवर होताना पाहायला मिळतो आहे. त्याचप्रमाणे गेल्या तीन वर्षात साहित्याच्या किंमती अव्वाच्या सव्वा महागल्या आहेत. त्यामुळे घरांच्या किंमती वाढलेल्या आहेत. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत . विकासदरातही काही उल्लेखनीय वाढ नोंदवण्यात आलेली नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात घरे आणखी महाग होतील, अशी शक्यता दिसून येत आहे. मुंबईपासून अगदी पनवेलपर्यंत अनेक फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने अनेकजण या फ्लॅट्सवर आकर्षक सवलती देत आहेत. परंतु, त्याला मिळणारा प्रतिसाद कसा असणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
कोविड महामारीत लागू करण्यात आलेले निर्बंध आता हटवण्यात आलेले आहेत. पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरासह नवी मुंबईतील जागा किंवा खरेदीला लोकांची पहिली पसंती आहे. त्यामुळे या भागातील घरांच्या, सदनिकांच्या, फ्लॅट्सच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढल्या आहेत. भविष्यात या किंमती कमी होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात या भागातील जागांचे दर आणखी वाढले, तर त्यामध्ये आश्चर्य होण्यासारख अस काही नसेल!