आटपाडी: लग्न आणि सणासुदीच्या काळात सोने खरेदीकडे लोकांचा कल मोठ्या प्रामाणात वाढलेला दिसतो. परंतु खुपदा सोने खरे आहे कि खोटे याबाबत संशय असतो. अनेक वेळा लोक बाजारातील लहानशा दागिन्यांच्या दुकानात सोने खरेदी करतात. नंतर सोने खोटे निघाले तर त्यांचे मोठे प्रमाणात नुकसान होते. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खऱ्या आणि खोट्या सोन्यामधील फरक समजून घेणे गरजेचे आहे. यामुळे तुमची फसवणूक होणार नाही.
जेव्हा तुम्ही बाजारात सोने खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा दागिन्यांवर नेहमी हॉलमार्क चिन्ह असावे याची काळजी घ्या. हे सोन्याची शुद्धता दर्शवते. सर्टिफिकेशन ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सद्वारे शुद्ध सोन्याला हे चिन्ह दिले जाते. स्थानिक ज्वेलर्स हॉलमार्कशिवाय दागिने विकतात. अशा परिस्थितीत हॉलमार्क केलेले सोने विकणाऱ्या दागिन्यांच्या दुकानातूनच सोने खरेदी करण्याचा प्रयत्न कराआणि फसवणूक टाळा.
२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. त्यामुळे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
तसेच, पाण्याच्या मदतीने तुम्ही खरे आणि खोटे सोने लगेच ओळखू शकता. पाण्यात टाकल्यावर खरे सोने लगेच बुडते. तर खोटे सोने पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते. एक ग्लास पाण्याच्या साहाय्याने तुम्ही खरे आणि खोटे सोने ओळखू शकता. जर सोने पाण्याच्या पृष्ठभागाच्या खाली जात नसेल तर ते खोटे आहे.
त्याचप्रमाणे, चुंबक खऱ्या सोन्याला चिकटत नाही. परंतु खोट्या सोन्यावर चिकटू शकते. सोन्यामध्ये चुंबकीय धातू मिसळण्यात आल्यास चिकटते. त्यामुळे खोटे सोने ओळखण्यासाठी तुम्हाला चुम्बकाची मदत होईल . तसेच, सोन्यावर व्हिनेगरचे काही थेंब टाका. नंतर व्हिनेगर रंग बदलत आहे की नाही ते तपासा. जर व्हिनेगर रंग बदलत असेल तर सोने बनावट आहे. अशा सर्वप्रकारे तुम्ही सोने खरे आहे कि खोटे ओळखू शकता.