Type Here to Get Search Results !

देशांतर्गत कोळसा उत्पादनात वाढ; जाणून घ्या सविस्तर माहिती




नवी दिल्ली: देशांतर्गत कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी सरकारच्या धोरणात्मक उपायांमुळे कोळशाची उपलब्धता वाढली आहे. कोळसा आयात २०१९-२० मधील २४८.५४ मेट्रिक टनावरून २०२०-२१ मध्ये २१५.२५ एमटी पर्यंत घसरली. एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान कोळशाची आयात १७३.३२ एमटी पर्यंत कमी झाली. गतवर्षी या कालावधीत ही आयात १८०.५६ एमटी एवढी होती, अशी माहिती केंद्रीय कोळसा,खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरातून हि माहिती दिली. 



ऊर्जा क्षेत्राद्वारे कोळशाची आयात २०१९-२० मधील ६९.२२ एमटी वरून २०२०-२१ मध्ये ४५.४७ एमटी वर घसरली. एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत, ऊर्जा क्षेत्राद्वारे कोळशाची आयात २२.७३ एमटी पर्यंत कमी झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ही आयात ३९.०१ एमटी एवढी होती.



कोल इंडिया लिमिटेड द्वारे कोळसा पुरवठ्याचा वाटा, २०१९-२० मध्ये कोळशाच्या एकूण वापराच्या सुमारे ६०.८% होता. २०२०-२१ मध्ये ६३.३% आणि पुढे २०२१-२२ मध्ये ६४.३% पर्यंत वाढला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies