Type Here to Get Search Results !

सोने आणि चांदीच्या दरात वाढ ;जाणून घ्या आजचा दर


मुंबई : सोने आणि चांदीच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात कालच्या तुलनेत आज 600 रुपयांची भाववाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर हा जवळपास 48 हजार झाला आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 52 हजार तीनशे रुपयांच्या पार गेला आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज 640 रुपयांची भाववाढ नोंदवण्यात  आली आहे. एकीकडे 54 हजारापर्यंत पोहोचलेले सोन्याचे दर हे आता 52 हजारांपर्यंत खाली उतरले असले तरिही आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरांचा आलेख हा पुन्हा चढत असल्याचे आकडेवारीवरुन दिसून आले आहे. गुडरीटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सोने महागले आहे. 22 आणि 24 या दोन्ही कॅरेट सोन्याच्या प्रकरात भाववाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांत सोने जवळपास हजार रुपयांनी महागले आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही तेजी पाहायला मिळाली आहे.


महाराष्ट्रातील सोन्याचा दर खालीलप्रमाणे 


मुंबई 22 कॅरेट – 47 हजार 950 24 कॅरेट – 52 हजार 310

नाशिक 22 कॅरेट – 48 हजार 50 24 कॅरेट – 52 हजार 350

पुणे 22 कॅरेट – 48 हजार 50 24 कॅरेट – 52 हजार 350

नागपूर 22 कॅरेट – 48 हजार 20 24 कॅरेट – 52 हजार 330


एकीकडे सोन्याचे दर वाढत असतानाच आता चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. जवळपास हजार रुपयांची वाढ रुपयांची वाढ चांदीच्या दरात नोंदवण्यात आली आहे. एक किलो चांदीचे दर 68 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे. 900 रुपयांची वाढ चांदीच्या दरात नोंदवण्यात आली आहे.


चांदीचे दर खालीलप्रमाणे


मुंबई 68,500

पुणे 68,500

नाशिक 68,500

नागपूर 68,500



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies