Type Here to Get Search Results !

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते “यांच्या” अडचणीत वाढ; मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला



मुंबई: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याविरोधात माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे. दरेकर बोगस मजूर असल्याचे दाखवत मुंबई बँक, हजारो ठेवीदार आणि सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी करत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.


फसवणूक केल्याप्रकरणी प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी दरेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळण्यात आला आहे.


प्रवीण दरेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन गुन्हा रद्द करा अशी विनंती केली होती, तसेच अटकेपासून संरक्षण द्या अशी विनंती केली होती. ही विनंती उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने फेटाळून लावताना अटकपूर्व जामीनासाठी रितसर मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करा असे निर्देश दिले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies