Type Here to Get Search Results !

येरवडा कारागृहात कैद्याची गळफास घेत आत्महत्या!

 




पुणे : पुण्यातील येरवडा कारागृहातील एका कैद्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याची उघडकीस आली आहे. गणेश जगन्नाथ तांबे (५३) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे.या कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.



घटनास्थळ मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी गणेश जगन्नाथ तांबे हा येरवडा कारागृहात २०१० च्या खुनाच्या गुन्ह्यात खुल्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगत होता. काल दुपारी बराक क्रमांक दोन येथील स्वयंपाकचे काम झाल्यावर, तिथे काही वेळाने गणेश जगताप याने गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे.



या घटनेची माहिती मिळताच,डॉक्टरांनी तपासणी केली असता,डॉक्टरांनी या कैद्याला मृत घोषित केले आहे. तर आरोपीच्या आत्महत्या करण्याच्या मागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies