Type Here to Get Search Results !

“राज्यपाल छत्रपतींबद्दल बोलले, तेव्हा कुठे होता?”,‘यांचा’ सदाभाऊ खोत याना सवाल!




महाराष्ट्र: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मुलीबाबत केलेले भाष्य चर्चेचा विषय ठरत आहे. राजकीय वर्तुळातून या विधानावरून उत्तर प्रत्युत्तर येत असून त्यावरून जितेंद्र आव्हाड आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये ट्विटरवर जोरदार कलगीतुरा रंगताना दिसत आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका विधानावरून या वादाला जोरदार सुरुवात झाली आहे. “माणसाला भीती खात असते. रात्री ३ वाजता टकटक झाले, तर हार्ट अटॅक येण्याचीच शक्यता असते. ध्यानी-मनी-स्वप्नीच नसते कुणाच्या घरात कोण घुसेल हे… यात सर्वात हाल होतात ते अशा माणसांचे ज्यांचा तुमच्या राजकारणाशी संबंध नसतो. माझ्या मुलीचा राजकारणाशी संबंध काय? पण तिला जर उद्या नुसते बोलवले, तरी ती आत्महत्या करेल”,असे विधान त्यांनी केले होते.  त्यावरून सदाभाऊ खोत यांनी निशाणा साधला आहे.


सदाभाऊ खोत यांनी यासंदर्भात ट्वीट करताना जितेंद्र आव्हाडांवर जोरदार टीका केली आहे. “हा जिजाऊ आणि शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आमच्या मुली इथेच मोठ्या होतील. हिजाब आणि बुरखा घालून फिरणाऱ्या इतर राज्यात आपण मुलगी पाठवणार आहात का?” असा जोरदार प्रश्न सदाभाऊ खोत यांनी केला आहे.


तसेच, “शिवरायांनी धाडसी राजकारण केले. शत्रूच्या बायका-मुलं-मुलींना छळले नाही. उगाच त्यांचा कारभर आणि त्यांना बदनाम करू नका. तशी शिकवण जिजाऊंची होती. राज्यपाल जेव्हा छत्रपतींबद्दल बोलले तेव्हा कुठे होतात?” असा प्रश्न खोत यांच्या ट्वीटला प्रत्युत्तर देत आव्हाडांनी केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies