Type Here to Get Search Results !

दिल्ली विमानतळावर लालूप्रसाद यादव यांची तब्येत बिघडली!

 



नवी दिल्ली: राष्ट्रीय जनता दलाचेनेते लालू प्रसाद यादव  यांची तब्येत बघिडली आहे. त्यामुळे त्यांना एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या किडनी आणि इतर चाचण्या करण्यात आल्या आहेत. परंतु, त्याचा अहवाल अजून आलेला नाही. 


घटनास्थळ व मिळालेल्या माहितीनुसार, लालूप्रसाद यादव रांची जाण्यासाठी दिल्ली विमानतळावर आले होते.परंतु,  विमानतळावरच त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना पुन्हा एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पाच डॉक्टरांची टीम तैनात आहे. या आधी लालूप्रसाद यादव बुधवारी एम्समध्ये आले होते. परंतु, त्यांना अॅडमिट करून घेण्यास नकार देण्यात आला होता. त्यांना रांचीच्या रिम्स रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे लालूप्रसाद यादव रांचीला जाण्यासाठी ते निघाले होते. परंतु, तब्येत बिघडल्याने नंतर एम्सच्या परवानगीनेच त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies