पेट्रोल-डिझेलच्या विक्रीला सैन्याचे संरक्षण! जाणून घ्या सविस्तर माहिती

आपला शेजारी देश श्रीलंका सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तेथे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. डिझेल-पेट्रोल आणि गॅसच्या बाबतीत तर परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. पेट्रोल आणि डिझेल खरेदीच्या प्रकरणात काही लोकांचा मृत्यूही झाला आहे. तेथील परिस्थिती आता इतकी बिघडली आहे की, श्रीलंका सरकारने पेट्रोल पंप आणि गॅस स्टेशनवर सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेत डिझेल आणि पेट्रोलच्या किमती वाढल्याच नाहीत तर त्यांचा तुटवडाही निर्माण झाला आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर लांब रांगा लागल्या आहेत.तेल खरेदीसाठी हजारो लोक तासनतास रांगेत उभे आहेत. श्रीलंकेच्या लष्कराचे प्रवक्ते निलांथा प्रेमरत्ने यांच्या हवाल्याने एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, तासनतास रांगेत उभे राहिल्यानंतर तीन वृद्धांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पेट्रोल पंपावर लष्कर तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती बिघडू नये म्हणून लष्कर फक्त तेल वाटपासाठी मदत करेल, असे प्रेमरत्ने म्हणाले. ते म्हणाले की, देशातील सर्व पेट्रोल पंपांवर किमान 2-2 लष्कराचे जवान असतील. श्रीलंकेत, पेट्रोल आणि डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या बातम्या आल्या आहेत. सोमवारी अशाच एका घटनेत एका व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तीनचाकी चालकाशी झालेल्या वादातून ही घटना घडली. याआधी कडक उन्हात तासनतास रांगेत उभे राहून तीन वृद्धांचा मृत्यू झाला होता. लष्कर तैनात झाल्यानंतर परिस्थिती सुधारेल, अशी आशा अधिकाऱ्यांना आहे.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured