Type Here to Get Search Results !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट जरूर पाहावा कारण...अमित शहा यांचे वक्तव्य!





नवी दिल्ली:  विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला  ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून देशभरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम रचले आहेत . तसेच, या चित्रपटावरुन राजकारणही जोरात  तापले आहे. काश्मीरमधील पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे.  परंतु, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा चित्रपट का बघावा, यावर जोरदार भाष्य केले आहे.



“ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही त्यांनी हा चित्रपट जरूर पाहावा, जेणेकरून काँग्रेसच्या काळात काश्मीर किती दडपशाही आणि दहशतीखाली होते हे त्यांना कळेल. जेव्हा तुम्ही नरेंद्र भाई (नरेंद्र मोदी) यांना दुसऱ्यांदा पंतप्रधान केले तेव्हा त्यांनी ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हटवले. ज्या क्षणी नरेंद्रभाईंनी कलम हटवण्याचा निर्णय घेतला, त्या क्षणी देशभरातील लोकांना हे समजले की नरेंद्रभाईंसारख्या प्रबळ इच्छाशक्तीच्या नेत्याने देशाचे नेतृत्व केले तर काहीही अशक्य नाही.” असे, अमित शहा हे अहमदाबाद महानगरपालिकेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.



तसेच, “विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ १९९० च्या दशकाच्या सुरुवातीस पाकिस्तान समर्थित अतिरेक्यांनी समुदायाला लक्ष्य केल्यानंतर काश्मिरी पंडितांना त्यांच्या मूळ राज्यातून जबरदस्तीने बाहेर काढण्याभोवती फिरते. या चित्रपटाला अनेक भाजपाशासित राज्यांनी करमुक्त केले आहे,” असेही ते म्हणाले आहेत. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies