Type Here to Get Search Results !

विद्यार्थिनींच्या पहिल्या तुकडीला प्रशिक्षण देण्यास ‘एनडीए’ सज्ज ; देशभरातून १९ मुलींची निवड!

 


पुणे : सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी पायाभूत प्रशिक्षण देणारी देशातील प्रतिष्ठित संस्था असलेली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) विद्यार्थिनींच्या पहिल्या तुकडीला प्रशिक्षण देण्यास सज्ज झाली आहे. जून २०२२ पासून खडकवासला येथील प्रबोधिनीच्या आवारात विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थिनींचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. त्यासाठी देशभरातून १९ मुलींची निवड करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, साडेसोळा वर्ष वयोगटातील मुलींची केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेली लेखी प्रवेश परीक्षा, सव्‍‌र्हिस सिलेक्शन बोर्ड मुलाखती आणि वैद्यकीय परीक्षा अशी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून या १९ मुलींची एनडीएच्या पहिल्या तुकडीसाठी निवड करण्यात आली आहे. निवडण्यात आलेल्या १९ पैकी १० विद्यार्थिनी भारतीय लष्कर प्रशिक्षणासाठी, सहा विद्यार्थिनी हवाईदल प्रशिक्षणासाठी तर तीन विद्यार्थिनी नौदल प्रशिक्षणासाठी एनडीएमध्ये दाखल होणार आहेत.


विद्यार्थिनींच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षक आणि कर्मचारी यांची नियुक्ती केली जाईल. महिला अधिकाऱ्यांना पुरुषांच्या तुकडय़ांचे नेतृत्व करण्याची संभाव्य गरज लक्षात घेऊन, ऑफिसर्स ट्रनिंग अकॅडमी चेन्नई, इंडियन नेव्हल अकॅडमी एझिमला आणि इंडियन एअर फोर्स अकॅडमी हैदराबाद यांच्या धर्तीवर विद्यार्थिनींचे प्रशिक्षण पूर्ण केले जाणार असल्याचे एनडीएकडून सांगण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies