Type Here to Get Search Results !

पोलिसांच्या अडवणुकीमुळे नववर्षाच्या स्वागतयात्रा रद्द…!

 



नाशिक : गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या नववर्ष स्वागतयात्रा व त्या अनुषंगिक सांस्कृतिक कार्याला परवानगी देण्यासंदर्भात पोलिस प्रशासनाकडून अडवणूक केली जात असल्याने संतप्त झालेल्या नववर्ष स्वागतयात्रा समितीने नववर्षाचे सर्वच कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित कार्यक्रमांबाबत सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करूनही कोणत्याही स्वरूपाची परवानगी दिली जात नाही.



शहरात दरवर्षी थाटामाटात आणि ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचे शहरभर स्वागत केले जाते. त्यासाठी ठिकठिकाणाहून स्वागतयात्रांचे आयोजन केले जाते. कोरोनामुळे गेली दोन वर्षे या स्वागतयात्रा होऊ शकल्या नाहीत. आता सर्व प्रकारचे निर्बंध हटल्याने वाजत-गाजत स्वागतयात्रा काढण्याचे प्रयोजन असतानाच, त्याला नाशिक पोलिस प्रशासनाकडून परवानगी दिली जात नसल्याने या परंपरेला छेद बसला आहे. स्वागतयात्रा तसेच त्या अनुषंगिक अंतर्नाद, महावादन आणि रांगोळी अशा कार्यक्रमांबाबत स्वागतयात्रा समितीने परवानगी मिळण्यासाठी गेल्या 5 मार्च रोजीच पोलिसांकडे कागदपत्रे सादर केली आहेत. असे असताना, पोलिस आयुक्तालयाकडून या कार्यक्रमांना परवानगी 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies