Type Here to Get Search Results !

पुण्यात ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक लागली आग!








पुणे : इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. पुण्यात पार्किंगमध्ये असलेल्या ओला एस १ ईव्ही इलेक्ट्रिक बाइकला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये बाइक जळून खाक झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेबाबत इलेक्ट्रिक कंपनीकडून ओला दुजोरा देण्यात आला आहे.



वाढते प्रदूषण आणि महागाई लक्षात घेता,सध्या बाजारात इलेक्ट्रिक बाइक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाहण्यास मिळत आहेत . अनेक कंपन्याच्या इलेक्ट्रिक बाइक बाजारात उपलब्ध झाल्या  आहेत. त्यातील ओला एस १ ईव्ही कंपनीच्या इलेक्ट्रिक बाइकला नागरिकाचा चांगलाच प्रतिसाद दिला आहे. पण अशा घटनांमुळे या वाहनांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.



पुण्यातील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये दुपारच्या सुमारास ओला एस १ईव्ही बाइक उभी केली  होती. कोणाला काही समजण्याच्या आतच या इलेक्ट्रिक बाइक मधून हळूहळू धूर येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अगदी काही मिनिटांत बाइकने पेट घेतला. या आगीमध्ये बाइक पूर्ण जळून खाक झाली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या घटनेबाबत ओला एस १ ईव्ही कंपनीकडून दुजोरा देण्यात आला आहे. बाइकला कोणत्या कारणाने आग लागली हे अद्याप समजू शकले नाही.



या घटनेवर ओला इलेक्ट्रिकने एक निवेदन जारी करून स्पष्टीकरण दिले आहे. ‘पुण्यात आमच्या एका स्कूटरला आग लागली. आम्ही मुख्य कारणाचा शोध घेत आहोत आणि अधिक माहिती लवकरच तुम्हाला दिली जाईल. आम्ही ग्राहकांच्या सतत संपर्कात आहोत आणि ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. वाहन सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये चांगल्या दर्जाची उत्पादने वापरतो. आम्हाला या घटनेचे गांभीर्य समजले असून आम्ही तुम्हाला येत्या काही दिवसांत अधिक  तपास घेऊ  , असे ओलाने म्हटले आहे .




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies