Type Here to Get Search Results !

पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान राजीनामा देण्याची शक्यता; अचानक 50 मंत्री गायब!दिल्ली :  पाकिस्तानात राजकीय भूकंप होण्याच्या मागे असून पंतप्रधान इम्रान खान राजीनामा देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात विरोधक एकवटले आहेत. 8 मार्चला विरोधकांनी इम्रान खान सरकारविरोधात अविश्वासाच्या प्रस्तावाची नोटीस दिली होती. त्यानंतर पाकिस्तानात राजकीय अस्थिरतेचं वातावरण निर्माण झाले आहे . देशातील आर्थिक संकट आणि वाढत्या महागाईला इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे .

 आता क्रिकेटपटूतून राजकारणी झालेले इम्रान खान सध्या आपले सरकार वाचविण्यासाठी धडपडत आहे . तर दुसरीकडे पाकिस्तानातील 50 मंत्री अचनाक गायब झाल्याचं वृत्त आहे. यावरुन पंतप्रधान इम्रान खान यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला असून खासदारांच्या घोडेबाजारात विरोधक गुंतले असल्याचा आरोप त्यांनी केला गेला आहे . दुसरीकडे इम्रान खान आपल्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये एका मोठ्या सभेला संबोधित करत आहेत. इम्रान खान यांच्या सरकारवर देशातील आर्थिक संकट आणि वाढत्या महागाईला त्यांचं सरकार जबाबदरा असल्याचा आरोप केला आहे . 24 खासदारांनी बंड केल्याने इम्रान सरकार अल्पमतात आहे. इस्लामाबादमधील रॅलीत सहभागी होण्यासाठी त्यांचे हजारो समर्थक परेड ग्राऊंडवर पोहोचले आहेत. खासगी माध्यमांना रॅलीतून हाकलून लावले आहे.तर दुसरीकडे इम्रान खान यांच्या सरकारमधील 50 मंत्री अचनाक गायब झाल्याची अशी माहिती  पुढे आलेली आहे.

मिळालेल्या  माहितीनुसार, पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जनरल बाजवा इम्रान खान यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणत असल्याचे  बोलले जात आहे.   बाजवा यांनी इम्रान खान यांना राजीनाम्याचे पत्र पाठवले गेले  आहे.
इस्लामाबादच्या सभेत इम्रान खान राजीनामा देऊ शकतात. ते पुन्हा निवडणुकीची मागणी करू शकतात. या मेळाव्यात त्यांच्या पक्षाने सर्व खासदारांच्या राजीनाम्याची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर खासगी वाहिन्या इम्रान खान यांच्या रॅलीचे कव्हरेज करणार नसल्याचेही बोलले जात आहे. दुसरीकडे, इस्लामाबादमधील सर्व रुग्णालयांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. इम्रान खानच्या परेड ग्राऊंडच्या रॅलीत केवळ 40 हजार लोक पोहोचले आहेत. इम्रान खान यांच्या पक्षाने 10 लाख लोक आल्याचा दावा केला होता.
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies