Type Here to Get Search Results !

“पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार”; अजित पवारांनी केले स्पष्ट!




महाराष्ट्र  : पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाला  आणि कमी झालेल्या पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. आत्ताच्या तुलनेत पेट्रोल डिझेलच्या किमतीत आणखीच वाढ होणार आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात सांगितले आहे .




तसेच, “पेट्रोल आणखी वाढणार कारण रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर इंधनाच्या किमती वाढतायत, म्हणून अर्थसंकल्प सादर करताना सिलेंडर वापरणारा महिला वर्ग, सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या या सगळ्यांचा एक हजार कोटी टॅक्स माफ केला जाणार आहे. करोनानंतर अर्थसंकल्पामध्ये एका  रुपयाची वाढ केली नाही. परतू  त्यातून आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केला आहे, शेवटी विकासही झाला पाहिजे आणि सरकारही  चालले  पाहिजे” असे इंधन दरवाढीबद्दल पुण्यात माध्यमांशी बोलत असताना अजित पवार म्हणाले आहेत. 




अमेरिका आणि  सौदी अरेबियानंतर रशिया हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश म्हणुन ओळखला जातो. परंतु  रशिया व  युक्रेन युद्ध सुरु असल्याने निर्यात केलेल्या कच्च्या तेलापैकी ६५ टक्के तेल आंतरराष्ट्रीय बाजारात येत नाही. त्यामुळे जगात तेलाचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेल आणि गॅसच्या किमती झपाट्याने वाढत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies