Type Here to Get Search Results !

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; जाणून घ्या सविस्तर माहिती....!



इंडियन ऑइल ने बुधवारी मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. या खरेदीत रशिया कडून डिस्काउंटमध्ये विकत घेण्यात आलेल्या तेलाचा देखील समावेश आहे. सोबतच या कंपनीने वेस्ट अफ्रीकन ऑइल ची देखील खरेदी केली आहे. रशिया कडून 30 लाख बॅरेल तेल खरेदी केले. विश्वासनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइलने मे महिन्यासाठी रशियाकडून 30 लाख बॅरेल तेलाची खरेदी केली आहे. त्याचबरोबर 20 लाख बॅरेल वेस्ट आफ्रिकन तेलाची खरेदी सुद्धा केली आहे. पेट्रोलियम कंपनीने रशियाकडून या कच्च्या तेलाची खरेदी ‘Vitol’ नावाच्या ट्रेडर कडून मोठ्या सवलतीच्या दरात केली आहे.  या खरेदी व्यवहारामुळे बाजारात पुन्हा रशिया आणि भारत यांच्याबद्दल चर्चा होताना दिसत आहे.



रशियाने ने 24 फेब्रुवारीला युक्रेन वर हल्ला केला होता त्यानंतर रशियाला अनेक आर्थिक निर्बंधांचा सामना करावा लागला होता. या सर्व कारणांमुळे रशियाला जागतिक पातळीवर व्यवसाय करण्यासाठी देखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते ,कारण की त्यांना डॉलरमध्ये सगळा व्यवहार करावा लागत होता. रशियन व्यवसायिकांना डॉलर मध्ये व्यवस्थित ट्रेड करायला जमत नव्हते त्याचबरोबर रशियामधील बँक आणि फायनान्शिअल सिस्टम वर देखिल निर्बंध लावण्यात आले होते, म्हणूनच रशियाने अनेक देशांसोबत त्यांच्या स्थानिक मुद्रा मध्ये व्यापार करण्यास सुरुवात केली. रशिया हल्ली कच्च्या तेलाला डिस्काउंट वर मोठ्या प्रमाणात विकत आहे.




रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष संपुष्टात यावे यासाठी भारताने वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले होते.आपल्या सर्वांना माहिती आहे की,भारत आणि रशिया यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून व्यापारी राजनैतिक आणि सांस्कृतिक संबंध आहे. या कारणामुळे भारताने रशियाच्या कच्च्या तेलाच्या आयातीवर कोणत्याच प्रकारचे निर्बंध लावले नव्हते. भारत जगातील तेलाची आयात करणारा तिसरा देश आहे. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक पूर्ततेसाठी 80% कच्च्या तेलाकरीता भारताला रशियावर अवलंबून राहावे लागते.



याशिवाय इंडियन ऑइल ने Exxon कडून नाईजीरियन उसान आणि अगबामी कच्च्या तेलाचे 10-10 बॅरेल ची खरेदी केली. कंपनीने अद्याप या डील संबधित कोणतेच वक्तव्य केले नाही.



पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त ?


इंडियन ऑइल देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी आहे सोबतच पेट्रोल-डिझेल च्या रिटेल सेलमध्ये देखील या कंपनीचे वर्चस्व आहे. अशातच डिस्काउंट वर मिळालेल्या कच्च्या तेलामुळे लोकांना येणाऱ्या दिवसांमध्ये पेट्रोल डिझेल स्वस्त मिळू शकते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पेट्रोल डिझेल चे दर सर्वसाधारणपणे 137 दिवस स्थिर होते. आता पुन्हा या दरांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे गेल्या मंगळवारी आणि बुधवारी दोन्ही दिवस कंपनीने पेट्रोल डिझेलचे दरात दोन दिवसांमध्ये 80 पैसे प्रति लिटर ची वाढ केली आहे. गुरुवारी हे दर स्थिर होते. देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्ली मध्ये पेट्रोलचे भाव 97.01 रुपये इतके आहे तर डिझेल चे भाव 88.27 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies